Thursday, October 2, 2008

पाऊस मला आवडतो...

पाऊस मला आवडतो...
मग तो कसा का असेना...
मला तो माझ्यापासुनच दूर घेऊन जातो...

त्याच धो-धो कोसळण,
सरीमागुन सरींनी देहावर वार करण,
त्याच क्षणभरासाठी उन्हातल फिरकण
प्रत्येक थेंबाच सुर्याच्या किरणांबरोबर चमकण...
सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो.....

त्याच हळुवार आगमन करण,
चोर पाऊलांनी येऊन मनाच्या कुशीत शिरण,
लहरीनुसार कधी संथ गतीन बरसण
बरसताना हलक्या हवेबरोबर थोडस सरकण.....
सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो.....

त्याच सुकलेल्या मातीत एकरुप होण,
खडकाळ जमीनीवरुन खळखळुण वाहण,
अवनीचा देह क्षणात शांत करण
तिच्या मनाला प्रेमाचा ओलावा देण.....
सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो.....

मन एकट असेल तर आठवांची मैफिल सजऊण देण,
मैफिली असेल तर एकट करुन टाकण,
आठवांना आठवताना कधी चेहऱ्यावर हसु उमटवण
तर कधी नयनातील अश्रुंना आपल्या सोबत घेऊन जाण....
सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो.....

मला त्याच्या आठवणीत नेऊन सोडण,
त्याला माझ्या जवळ घेऊन येण,
हजरो मैलांच अंतर क्षणात दूर करण,
दोघांची मन एकमेकांच्या प्रेमात भिजवण..
हे फक्त त्या पावसालाच जमत... म्हणुन मला पाऊस आवडतो.....
खरच मला तो खुप खुप आवडतो......

चित्रा

मी आहे एक जलधार..

मी आहे एक जलधार
न लागे पाठीशी आधार

वाहते मी सपाट जमीनीवरुन
तर कोसळते कधी उंच कडयावरुन

चाखुणी सृष्टीचे माधुर्य
वाढवले माझे मी सौदर्य

भासले मी जरी कोमल
मन नाही माझे दुर्बल

साथ लाभता काळाची
भीती न उरली कोणाची

जाणला मी जीवनाचा अर्थ
सातत्य हेच माझे सामर्थ्य

चित्रा

प्रेम म्हणजे ..

प्रेम म्हणजे संगीतातील राग
आयुष्याला सुगंधमय करणारी फुलांची बाग

प्रेम म्हणजे मनाचा हूंकार
तिच्या झुकलेल्या नजरेतून त्याला मिळालेला होकार

प्रेम म्हणजे एक सुरेल गीत
दोन अनजान जीवांची एकमेकावर जडलेली प्रीत

प्रेम म्हणजे भक्ती
जगण्याला प्रेरणा देणारी विलक्षण शक्ती

प्रेम म्हणजे अतुट बंधन
मनाला बैचन करणार ह्रदयातील स्पंदन

प्रेम म्हणजे सर्वस्वाच दान
'स्व' ला विसरुन घेतलेल अस्तित्वाच भान

चित्रा

शब्द माझे

शब्द माझे.....
कधी पाऊस पाडुन भिजवतात
कधी चंद्र बनुन लाजवतात
मनातील भावनांना तेच तर जपतात

शब्द माझे.....
कधी दुःखाच्या दरीत ढकलतात
कधी आठवणीच्या देशात भटकतात
काळॊखातील अश्रुनां तेच तर पुसतात

शब्द माझे....
कधी स्वप्नांमध्ये रमवतात
कधी वास्तवातील कटु सत्य दाखवतात
जीवनाचा अर्थ तेच तर सांगतात

शब्द माझे....
कधी भावनांचा बाजार भरवतात
कधी अश्रुनां विकत घेतात
कडेलोट होणाऱ्या देहाला तेच तर सावरतात..

शब्द माझे...
कधी वाऱ्याबरोबर डोलतात
कधी माझ्याबरोबर चालतात
चालताना मात्र मला ‌ऋणाईत बांधतात.... ऋणाईत बांधतात....

चित्रा

कोण आहेस तू....

गीतातील माझ्या सूर आहेस तू
गझलेतील माझ्या शेर आहेस तू

देहातील माझ्या श्वास आहेस तू
मनातील माझ्या विश्वास आहेस तू

आकाशातील माझ्या तारा आहेस तू
भोवातालचा माझ्या वारा आहेस तू

डोळ्यांतील माझ्या काजळ आहेस तू
अंतःरातील माझ्या वादळ आहेस तू

दुःखाशी लढण्याची शक्ती आहेस तू
ह्या वेडया मीरेची भक्ती आहेस तू

कसं सांगु रे तुला, कोण आहेस तू
'चित्रा'तील दुनियेचा रंग आहेस तू

चित्रा.....

विसरले नाही..

दगडाच्या देवाला पूजताना,
माणसातील देव पाहण विसरले नाही
नात्यातील गुंता सोडवताना,
भावनांचा आदर करण विसरले नाही

नियतीच्या घावांना झेलताना,
जगण्याचा आनंद लुटण विसरले नाही
रडण नशीबी आल,
तरी खळखळुन हसण विसरले नाही

आपला अहंकार चेपताना
स्वभिमानाला जपण विसरले नाही
पारीजातकाचा सुगंध घेताना
त्याच्या इवल्यशा जीवनरेषेला विसरले नाही

अमावस्येच्या रात्री झुरताना
पौर्णिमेच चांदण विसरले नाही
वैशाखात तापताना
'वर्षा'तील गारवा विसरले नाही

स्वप्नामध्ये रमताना
वास्तवातील सत्याला विसरले नाही
भविष्याकडे बघताना
वर्तमान काळातील जगण विसरले नाही

उगवत्या सुर्याच स्वागत करताना
अंधारातील वाटचाल विसरले नाही
कवितेचा छंद जोपासताना,
जीवनाच व्याकरणही विसरले नाही

चित्रा

चांदण्या रात्री..

चांदण्या रात्री निघाला
साजणा सजणीला भेटाया,
चंद्रही आला सोबतीला
त्यांच्या प्रेमाची साक्ष बनाया...

जवळ तो येताच,
मीटली ती लाजाळुच्या पानासारखी
अन भासली त्याला ती
चांदण्यात न्हाऊण आल्यासारखी...

बघुणी तिला लाजताना
मन त्याचे खटयाळ झाले,
तिच्या रुपाच्या सौर्दयाने
चंद्रालाही घायाळ केले..

थंड गुलाबी हवा
पदर तिचा उडऊ लागली...
तशी ओठांवरली लाली
गालांवर उमटु लागली

डोळ्यांच्या त्याच्या इशारे
ओठानां तिच्या उमजाया लागले
अन कानाजवळ येऊन भोवरा
प्रेमाचे गीत गुणगुणाया लागला..

स्पर्शासाठी तीच्या
तो कासावीस होऊ लागला,
थरथरणाऱ्या तिच्या
हातांना हळुच हातात घेऊ लागला..


क्षणार्धातच ती
मिठीत त्याच्या विसावली
जणु अंनतकाळापासुन वाहणारी
नदी सागराला जाऊन मिळाली

--चित्रा

रुप माझ्या सख्याचे

अमृताहुन गोड तुझी वाणी
काळजाला भिडणारा सुमधुर ध्वनी

ओठावर असते मादक हास्य
शब्दाना निस्तब्ध करणार भाष्य

आधार देणारा मजबुत खांदा
मन धुंद करणारा पुरुषी बांधा

डोळ्यातुन फुलते प्रेमाची कळी
पाहुनी तव मनी मदन जळी

नजर जाता आकाशावरती
जमती चांदण्या अवतीभोवती

चंद्राला फिक पाडणार हे रुप
वाढवतो माझा जगण्याचा हुरुप

चित्रा इंदलकर

भीती

जवळच्या माणसांना होणाऱ्या मरणाप्राय यातना बघत असते
त्यांच्या मनाला जीवंतपणी जळताना बघत असते
म्हणुनच की काय मला आता मरणाची भीती वाटत नाही

आयुष्याभर जिंकलेल्यांना क्षणात हरताना बघत असते
हार सहन करताना त्यांच्या मनाचा होणारा कोंडमारा बघत असते
म्हणुनच की काय मला आता हरण्याची भीती वाटत नाही

किल्लाच्या बुरुजाला तोफेच्या एका वारात कोसळताना बघत असते
बुरुज कोसळल्या नंतर त्याची होणारी दयनीय अवस्था बघत असते
म्हणुनच की काय मला आता कोसळण्याची भीती वाटत नाही

प्रकाशात टवटवीत असणाऱ्या फुलाना काळोखात कोमजताना बघत असते
कोमजल्या नंतर त्यांच्या सुकलेल्या पाकळ्यांना बघत असते
म्हणुनच की काय मला आता काळोखाची भीती वाटत नाही

सदा हसत असणाऱ्या चेहऱ्यांना एकांतात रडताना बघत असते
त्यांच्या डोळ्यांत आलेला आसवांचा पुर बघत असते
म्हणुनच की काय मला आता रडण्याची भीती वाटत नाही

खरच मला आता कशाचीच भीती वाटत नाही.....
पण मला कशाचीच भीती वाटत नाही ह्या गोष्टीची
मात्र मला खुप भीती वाटत आहे....

चित्रा

तूझं माझ्या आयुष्यात येण

मित्रानो ही माझी पहिली कविता आहे
अनि ही कविता मी माझा मित्र 'संदेश'साठी लिहली आहे.

तूझं माझ्या आयुष्यात येण
मैत्रीचा 'संदेश' देऊन गेलं,
निराधार झालेल्या मनाला
आधार देऊन गेलं

तूझं माझ्या आयुष्यात येण,
मला क्षणोक्षणी हसवून गेलं,
हरवलेल्या बालपणाची
पुन्हा एकदा आठवण करुन गेलं

तूझं माझ्या आयुष्यात येण
मला नवजन्म देऊन गेलं
रंग विसरु पाहाणाऱ्या 'चित्रा'ला,
रंगाची आठवण करुन गेलं

तूझं माझ्या आयुष्यात येणं
मला माझं वेगळेपण दाखवून गेलं,
मैत्री ह्या नात्याची
गरज निर्माण करुन गेलं

तूझं माझ्या आयुष्यात येणं
मला खुल्या आकाशात घेऊन गेलं,
जीवनाच्या ह्या वाटेवर
खऱ्याखुऱ्या मित्राची साथ देऊन गेलं

चित्रा इंदलकर

मला कधी कळलच नाही..

नियम माणसांसाठी
कि माणुस नियमांसाठी???
मला कधी कळलच नाही

आपण देवाला दगड मानतो
कि दगडाला देव मानतो???
मला कधी कळलच नाही

हसता-हसता रडायचं
कि रडता-रडता हसायचं???
मला कधी कळलच नाही

प्रेमात 'स्व'ला जपायचं
कि 'स्व'ला जपण्यासाठी प्रेम करायचं???
मला कधी कळलच नाही

चित्रा

कसा रे तु असा

कसा रे तु असा
कधी चांदणीला झुरवणारा
तर कधी तिला
प्रेमात चिंब-चिंब भिजवणारा

कसा रे तु असा
रोज एक नव रुप धारण करणार
रात्रीच्या काळॊखाला
तुझ सौदर्य बहाल करणारा

कसा रे तु असा
ढगाआड लपणारा
स्वःताहच प्रतिबिंब
सागरात स्वःहाच न्याहाळणारा

कसा रे तु असा
सर्वांना शितलता देणारा
नितळ, निखळ
प्रकाशाची सतत उधळण करणारा

कसा रे तु असा
प्रेमाची साक्ष देणारा
आपल्या मोहक रुपाने
सुंदरीना घायाळ करणारा

नाही रे कळत मला
कसा रे तु आहेस
पण एवढ मात्र खर
माझ्या जीवाभावाचा सखा तु आहेस....

चित्रा

मैत्री म्हणजे ..

मैत्री म्हणजे दोन मनानंच नाजुक बंधन
मैत्री म्हणजे मनाने मनाला केलेले वंदन

मैत्री म्हणजे अबोल शांततेत होणारा संवाद
मैत्री म्हणजे काळजाला भिडणारा निनाद

मैत्री म्हणजे एकाच्या सुखासाठी दुसऱ्याच तडफडण
मैत्री म्हणजे स्वःताहा पडत असतानाही दुसऱ्याला सावरण

मैत्री म्हणजे स्पर्श न करता दिलेला आधार
मैत्री म्हणजे सहवासातुन साकार झालेला आकार

मैत्री म्हणजे वाळवंटात पाण्याचा झालेला भास
मैत्री म्हणजे शेवटच्या क्षणापर्यत घेतलेला श्वास

मैत्री म्हणजे एकाचा दुसऱ्यावर असलेला अतूट विश्वास
मैत्री म्हणजे दोघांच्याही नकळत होणारा अखंड प्रवास

चित्रा

क्षितिज

डोळ्यासमोर दुरवर एक क्षितिज दिसतय..
मी जवळ येण्यासाठी मला हलकेच खुणावतय..
माहीत नाही का? पण मलाही त्याच्या जवळ जावस वाटतय..
एक अनामिक ओढ मला त्याच्याकडे खेचतेय अस जाणवतय..
माझ्याही नकळत माझ पाऊल त्याच्यादिशेने वळले आहे..
अन...एक अखंड प्रवास सुरु झाला आहे..
मुक्कामाच ठिकाण निश्चित नाही..
अंंतर किती कापाव लागेल याचाही पत्ता नाही..
कदाचित या प्रवासात मला बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतील..
पाऊले थकली तरी पुन्हा उचलावी लागतील..
कधी चालाव लागेल,कधी धावाव लागेल..
तर कधी श्वासांशी लागलेली शर्यत जिंकावी लागेल..
कारण ती हरले तर सर्वच संपेल..
अन..माझा हा प्रवास अर्ध्यातच उरकेल..
नाही..तस मी घडु देणार नाही...
एवढ्या सहजासहजी माझा कणा मोडु देणार नाही...
खात्री आहे मला माझ्या यशाची..
आशा आहे क्षितिजाला एकदाच गाठण्याची..

चित्रा इंदलकर

सख्या मला तुझ्या कुशीत घे ना !!

सख्या मला तुझ्या कुशीत घे ना !!
तुझा हात माझ्या हातात दे ना !!
आज मला खुप भीती वाटतेय रे
डोळ्यासमोर काळी सावली दिसतेय रे
मध्येच तिचा आकार महाकाय होत जातोय
तर कधी लहानश्या ठिबक्याइतका होतोय
माहीत आहे मला
ती मला गिळणार आहे....
सर्व खेळ क्षणात संपणार आहे....
तत्पुर्वी मला थोडस... अगदी थोडस... जगावस वाटतय...
कुसकरण्यापुर्वी कळीला फुलावास वाटतय...

चित्रा इंदलकर

कुणीतरी असाव...

कुणीतरी असाव...
हळव्या मनास जपणार,
कुशीत घेऊन समजवणार,
एकांतात आठवण काढणार,
मौनाची भाषा जाणणार...

कुणीतरी असाव...
माझ्यावर हक्कने रागवणार,
माझा रुसवा प्रेमाने काढणार,
दुःखात अश्रु होऊन साथ देणार,
सुखात हास्य होऊन फुलवणार...

कुणीतरी असाव...
कधी पाऊस होऊन बरसणार,
तर कधी प्रत्येक श्वासात मिसळणार,
चांदण्या राती हातात हात घेणार,
पहाटेच्या स्वप्नात येऊन हसवणार...

खरच कुणीतरी असाव...
जे फक्त आपल आणि आपल असाव
दुर राहुनही मनाच्या जवळ भासाव...

कधी कधी असही होत...

कधी कधी असही होत...
गर्दीत राहुनही मनाला
एकट एकट वाटु लागत
एकटेपण म्हणजे काय
आयुष्यात प्रथमच कळु लागत

कधी कधी असही होत...
नेहमीच उगवणारा दिवस
अगदीच नवा-नवास वाटु लागतो
कुणा एका व्यक्तीचा
सहवास हवा-हवासा वाटु लागतो

कधी कधी असही होत...
ओठांपर्यंत आलेले शब्द
ओठांतुनच परत फिरतात
त्यांचा उच्चार न होताच
समोरच्याला ऎकु जातात

कधी कधी असही होत..
कधीही न झुकणारी नजर
नकळत जमीन पाहु लागते
तिच्या गालावरची खळी
त्याला होकार देऊन जाते

चित्रा इंदलकर

वाळलेल पान असच उडत राहणार..

वाळलेल पान असच उडत राहणार..
चिमटीत न येणार दु:ख
ओंजळ भरुन वाहणार सुख
तरिही मी मात्र उभी स्तब्ध
पुन्हा एकवर शब्द होतात निःशब्द
अंधारात गडप होणाऱ्या वाटा
काळजात खोलवर रुतलेला काटा
संपुन गेले अंगातील त्राण
आता उरला फक्त देहात प्राण
एकटीच आली, एकटीच जाणार
दिल घेतल सगळ इथच राहणार
तरीही मी जगत राहणार
वाळलेल पान असच उडत राहणार..

-- चित्रा इंदलकर

पहिला स्पर्श...

मला आजही आठवतोय
तुझा तो पहिला स्पर्श
माझ्या मनाला झालेला हर्ष
बाजुला पसरलेली ती गर्द झाडी
तुझ्या प्रेमात बेभान झालेली मी एक वेडी
मावळत्या सुर्याची असलेली उपस्थिती
मनाची झालेली चल-बिचल स्थिती
मला आजही आठवतोय
तु धरलेला माझा तो हात
माझ्या देहाचा झालेला थरकाप
तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन
मी किती बिनधास्त होते....
साऱ्या जगाला विसरुन
तुझ्या रंगात रंगले होते....

चित्रा इंदलकर

अशीही एक रात यावी

अशीही एक रात यावी
तुझ्या प्रेमात मी भिजुनी जावी
चांदण्यांचा प्रकाश असावा
तुझा हात माझ्या हातात असावा
दोघांनीही नुसतच चालत रहायच
वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर झुलत रहायच
तु शांत माझ्याकडे पाहत असलेला
मी निवांत तुझ्या मिठीत विसावलेली
शब्दांची देवाणघेवाण होऊ नये
ओंठातील अबोलाही सुटु नये
पैजणाचा आवाज होऊ नये
चंद्रावरचा डागही कोणाला दिसु नये
दोघांचीही मन संथ पाण्याप्रमाणे व्हावीत
मनावर उठणारे भावनांचे तरंग विरळ व्हावीत
सुख-दुःखाचा गाळ क्षणभर तळाशी बसावा
अश्या ह्या राती मी तुझी आणि तु माझा असावा...

चित्रा

आज पुन्हा आठवणी आल्या

आज पुन्हा आठवणी आल्या
पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या
सुनं आकाश चांदण्यांनी भरुन आलं
वेड मन पुन्हा भुतकाळात रेंगाळलं

आठवाणींची सोबत आहे म्हणुनच
दुःखातही चेहऱ्यावर हसु उमटतं
काळ कितीही पुढे सरकला तरी
क्षणभर थांबुन मागे वळाता येतं

जी माणस हवी-हवीशी वाटतात
ती नेहमी आठवणीत साठवली जातात
सार जग पोरक्या नजरेने पाहत
तेव्हा मनात तिच आठवली जातात

साऱ्या क्षणांना मला जपावास वाटत
मनाच्या एका कोपऱ्यात ठेवावस वाटत
म्हणजे हव तेव्हा मला तिथे जाता येईल
त्यांना कुशीत घेऊन थोडस जगता येईल

--चित्रा

आले ते क्षण

आले ते क्षण,
गेले ते क्षण
झाले होते मन उगाच बैचन
मज हसवुन गेले ते,
मज फसवुण गेले
लवताच पापणी डोळ्यांतुन सांडुन गेले क्षण
नयनाची भाषा शिकवुन गेले ते,
स्पर्शाची आशा दाखवुन गेले
या जगण्याची दिशा बदलवुन गेले क्षण
आठवणींच रान पेरुन गेले ते,
स्वप्नांच दान देऊन गेले
उरातील चैतन्याची खाण दाखवुन गेले क्षण
रात जागऊन गेले ते,
पहाट खुलवुन गेले
क्षणक्षणाला आनंद उधळुन गेले क्षण

-----चित्रा

आला आला सखे

आला आला सखे
बघ पाऊस आला
येताना संगे गार
वारा घेऊन आला

थेंबा-थेंबात ग
त्याच्या आनंद साठलेला
अन मातीचा सुंगध
साऱ्या आसमंतात दाटलेला

काळे-काळे ढग
पाहुनी मोर थांबलेला
फुलवुनी पिसारा सारा
थुई-थुई नाचलेला

सरीवर-सरी बघ
कश्या कोसळत चालल्या
वेडया मनाच वेडेपण
त्या वाढवत राहिल्या

चिंब-चिंब भिजुनी
तन पावसात न्हालं
गारठुन वेड मग
रजनीच्या कुशीत शिरलं

चित्रा इंदलकर

आज तु पुन्हा आलास...

आज तु पुन्हा आलास...
नेहमीसारखाच,
न सांगता,
न बोलता,
न विसरता..
तस मलाही आवडत तुझ असच येणं
वर्षभर चुकवलेल देणं एका क्षणात देऊन जाणं...
तु आल्यावर मी एकदम वेडीपिशी होऊन जाते
तुझ्या रुपाला पाहण्यात दंगुन जाते...
कधी थेंब-थेंबात बहरतोस,
कधी धो-धो कोसळतोस,
तर कधी रात्रभर बरसतोस तू
माझ्या वेडया मनाला का बरे उगाच तरसवतोस तू??
तुझी किती वाट पाहिलेली असते मी
माझ्यातल्या 'मी'ला विसरलेली असते मी
आपल्यातल्या प्रितीला एकटीनेच जपलेले असते मी
तु मात्र आरामात येतोस आणि मला चिंब-चिंब भिजवुन जातोस
प्रतिक्षेला कंटाळलेल्या मनाला दिलासा देऊन जातोस
पण ह्यावेळी तुला मी नाही जाऊ देणार
गेलास तर मीही तुझ्या बरोबर येणार
तुझ्याशिवाय मला इथे एकटीला नाही राहायचं
तुझ्या आठवणीत मला आता नाही जगायचं
नेहशील ना रे मला तुझ्या सोबतीला
आकाशातील थंड थंड ढगांच्या भेटीला
तुझ्याबरोबर मीही हसेन,वावरेन,बरसेन
पण सांग ना रे तु मला नेहशील का??
तुझ्यासवे जगायच स्वप्न पुर करशील का??


चित्रा इंदलकर